Departmental News of Marathi:
मराठी विभागाने 'समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती' या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन केले होते. श्री. नितीन पाटील (मराठी मंडळ कॅलिफोर्निया, अमेरिका) यांनी 'मराठी साहित्य कला आणि संस्कृती जागतिक प्रसार आणि प्रचार', डॉ.सुधीर देवरे -'समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती', डॉ. हेमंत खडके- 'समकालीन मराठी कविता', डॉ. काशिनाथ बऱ्हाटे-'सद्यस्थिती - मराठी साहित्य आणि भाषा', डॉ. फुला बागुल-'समकालीन मराठी साहित्य - कथा', डॉ. प्रमोद पवार-'२००० नंतरच्या मराठी नाट्यलेखन तंत्राचे बदलते स्वरूप', डॉ.आशुतोष पाटील-मराठी अभ्यास मंडळ
मराठी विभागाने 'समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती' या विषयावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेबिनारचे आयोजन केले होते. श्री. नितीन पाटील (मराठी मंडळ कॅलिफोर्निया, अमेरिका) यांनी 'मराठी साहित्य कला आणि संस्कृती जागतिक प्रसार आणि प्रचार', डॉ.सुधीर देवरे -'समकालीन मराठी साहित्याची स्थितीगती', डॉ. हेमंत खडके- 'समकालीन मराठी कविता', डॉ. काशिनाथ बऱ्हाटे-'सद्यस्थिती - मराठी साहित्य आणि भाषा', डॉ. फुला बागुल-'समकालीन मराठी साहित्य - कथा', डॉ. प्रमोद पवार-'२००० नंतरच्या मराठी नाट्यलेखन तंत्राचे बदलते स्वरूप', डॉ.आशुतोष पाटील-मराठी अभ्यास मंडळ
आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी विभागातर्फे ‘मराठी भाषा दिवस’ निमित्ताने मराठीतील ‘साहित्यकृतीवर चर्चा’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. सुरुवातीला मराठी भाषा दिवस का साजरा केला जातो, त्यामागची भूमिका कथन केली गेली. कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा सर्वदूर मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. मराठी वाचन कट्टा ग्रुपच्या विद्यार्थ्यांनी प्रसिध्द आत्मकथन ‘भुरा’- डॉ. शरद बाविस्कर या साहित्यकृतीवर चर्चा केली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश जाधव हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका डॉ. सुधाकर चौधरी यांनी मांडली. त्यांनी सांगितले की, प्रस्तुत आत्मकथन हे आजच्या तरूण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त व अंतर्मुख करणारे आहे. आत्मकथनातील विविध प्रसंग, घटना हे आपल्याला अंतर्मुख करायला भाग पाडतात. शिक्षण घेत असताना येणाऱ्या अडचणी आपण स्वतःच सोडविल्या पाहिजेत. संघर्ष करून घेतलेले शिक्षण हे आपल्याला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात असते. शरद बाविस्कर यांनी जो संघर्ष आपल्या जीवनात केला तो विचार करायला भाग पाडणारा आहे. प्रस्तुत उपक्रमामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांनी मराठीतील उत्तमोत्तम ग्रंथांचे वाचन केले पाहिजे. ग्रंथ वाचनाने समृद्धी मिळते, चांगले काय वाईट काय याविषयी सजग जाणीवजागृतीचे भान येते. आपल्या मनात सजग जाणीवा निर्माण होतात आणि म्हणून या वाचन कट्ट्याच्या माध्यमातून मराठीतील उत्तमोत्तम अशा कलाकृती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यावर वाचक विद्यार्थी चर्चा करीत असतात. आजच्या या ग्रंथाची निवड या दिवसाच्या निमित्ताने अधिक उपयुक्त ठरते असे शेवटी सांगितले. मंगलसिंग पावरा या विद्यार्थ्याने ‘भुरा’ या आत्मकथनावर आपले सविस्तर मत मांडले. या आत्मकथानामध्ये आपल्याला शरद बाविस्करच्या आईचे संस्कार अतिशय महत्त्वाचे वाटतात. आईने सांगितलेलं जीवनाचे तत्त्वज्ञान महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्याला जी गोष्ट कठीण वाटते त्या गोष्टीला आपण घेरुन काढले पाहिजे. आपण त्या गोष्टीला घेरून काढलं तर आपल्याला त्याच्यात यश नक्कीच मिळत असतं, असे सांगितले. शरदचा शिक्षण घेत असतानाचा संघर्ष विचार करायला लावणारा आहे. वाचन कट्ट्यातील बालाजी पावरा या विद्यार्थ्यांने आपले मत मांडले. याबरोबरच सचिन पावरा, आदित्य पावरा, विशाल पावरा यांनीही या आत्मकथनावर चर्चा केली.
मराठी विभागातर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर व्याख्यानमाला ही ऑनलाइन झूम ॲपवर संपन्न झाली. आर. सी. पटेल कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. मराठीतील विविध मौलिक ग्रंथ विद्यार्थ्यांना पुरवून त्यांच्याकडून ग्रंथांचे वाचन करून घेतले जाते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात मराठी भाषा, मराठी साहित्य संस्कृती व लोककलावर प्रकाश टाकण्याचा उपक्रम महाविद्यालयात राबविला गेला. मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करून त्यातून मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन व्हावे या उदात्त हेतूने दरवर्षी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा दिनांक १४ ते २८ जानेवारी या कालावधीत साजरा केला जातो.