Departmental News of Defense Studies:
आर.सी.पटेल महाविद्यालयात दृकश्राव्य कार्यशाळा दिनांक 18 ते २२ जानेवारी २०२२ रोजी घेण्यात आली .सदर कार्यशाळा संरक्षण शास्त्र विभाग द्वारा आयोजित करण्यात आली "शिका कसे शकावे " या कार्यशाळेत प्रा.रमाकांत चौधरी प्रा,मिलिंद बचुटे ,प्रा.अनिल सोनवणे प्रा.अनिता जाधव व प्रा रजनीकांत सोनार यांनी मार्गदर्शन केले .पाच दिवसीय कार्य शाळेत रोज सायंकाळी ४ ते ६ दरम्यान झूम द्वारा आयोजित करण्यात आली .सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले सदर कार्यशाळा निशुल्क होती.
आर.सी.पटेल महाविद्यालय तर्फे वृक्षारोपण - संरक्षण शास्त्र विभाग कडून दिनांक २८/७/२०२१ रोजी शिरपूर तालुक्यातील दुर्बडया येथे वृक्षारोपण जिल्हा परिषद सदस्य मा.श्री .वसंत पावरा यांच्या हस्ते करण्यात आले .एकूण १०० वृक्ष रोप लावण्यात आली .कार्यक्रम प्रमुख प्रा.आर.एस.पवार हे होते .सोबत प्रा.रमाकांत चौधरी ,प्रा.रजनीकांत सोनार ,प्रा.अनिल सोनवणे उपस्थित होते .
दिनांक 5 जून २०२० रोजी आर.सी.पटेल महाविद्यालयात संरक्षणशास्त्र विभाग द्वारा आयोजित एक दिवसीय राष्ट्रीय वेबिणार महात्मा गांधीजी च्या विचारांवर घेण्यात आली. राष्ट्रीय वेबिणार चा विषय "आजची जागतिक परिस्थिती आणि महात्मा गांधी विचारांची प्रासंगिकता "हा होता.प्रमुख वक्त्या म्हणून श्रीमती कुसुम त्रिपाठी डॉ.बी.आर.आंबेडकर सामाजिक विद्यापीठ महू या होत्या .राष्ट्रीय वेबिणार चे अध्यक्ष डॉ.डी.आर.पाटील होते. .समन्वयक प्रा.डॉ.आर.एस.पवार हे होते .राष्ट्रीय वेबिणार मध्ये ४१० अभ्यासक विचारवंतानी सहभाग नोदविला सहभागी अभ्यासकांना मोफत प्रमाणपत्र इ मेल द्वारा देण्यात आले.
संरक्षणशास्त्र विभाग द्वारा आयोजित सर्जिकल स्ट्राईक डे महाविद्यालयात दिनांक २९/९/२०१८ रोजी साजरा करण्यात आला .सर्जिकल स्ट्राईक दिवसाचे महत्व आणि भारतीय जवानांनी शेजारील पाक व्याप्त काश्मीर मध्ये जावून शत्रूला गाफील ठेवून अतिरेकी वर अचूक हल्ला चढविला.कार्यक्रमात एकूण १४० राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील हे होते .सूत्रसंचालन डॉ.ए.जी.सोनावणे यांनी केले .आभार प्रा.महेश्वरी यांनी मानले.
दिनांक १० ऑक्टोबर २०२० रोजी ऑनलाईन झूम द्वारा संरक्षण शास्त्र व मानस शास्त्र विभाग यांच्या संयुक्त विध्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील हे होते .प्रमुख मार्गदर्शन डॉ.मिलिन बचुटे व प्रा.डॉ आर.एस.पवार हे होते .सदर कार्यक्रमात डॉ.डोंगरे डॉ.सोनार यांनी आपले विचार मांडले सदर कार्यक्रम संरक्षण शास्त्र विभाग तर्फे आयोजित करण्यात आला होता .प्रस्तावना आणि आभार डॉ.रमाकांत चौधरी यांनी मानले .
कोविड-२०१९ कोरना काळात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन / समुपदेशन करण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला .समन्वयक म्हणून डॉ.आर.एस.पवार संरक्षण शास्त्र विभाग प्रमुख यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांनी नियुक्ती केली .सदर समुपदेशन कक्ष विद्यर्थ्यांच्या परीक्षा संदर्भात अडचणी समस्या सोडवण्यात येत असे याचा महाविद्यालय व परिसरातील विद्यर्थ्यांनी लाभ घेतला .
दिनांक २६ जुलै २०२० रोजी संरक्षण शास्त्र विभागात कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला.अध्यक्ष प्राचार्य डॉ.डी.आर.पाटील होते विभाग प्रमुख डॉ.आर.एस.पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमात एकूण ७२ विद्यार्थी उपस्थित होते .प्रस्तावना आणि आभार डॉ.सुनील पाटील यांनी मानले .