Departmental News of Computer Application and Management:
Voter awareness Program
येथील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.सी.ए. विभागातील विद्यार्थ्यांनी क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्थरीय परीक्षेत उत्तम यश मिळवीत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह आपले महाविद्यालयाचे सालाबाद प्रमाणे या वर्षीही नाव गौरविले आहे.
आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.सी.ए. विभागातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थरीय परीक्षेचा प्रथम द्वितीय आणि तृतीय वर्षातील निकाल १००% असून मागाडे शुभम युवराज (CGPA-9.95) हा विदयार्थी महाविद्यालयात प्रथम आला असून माली विशाल रवींद्र (CGPA-9.90) द्वितीय पाटील श्रेया प्रमोद (CGPA-9.90) तृतीय गिरासे अवंतिका दरबारसिंग या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपले स्थान महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय असे स्थान पटकावले आहे.तसेच द्वितीय वर्गात भोई गणेश सखाराम(CGPA-9.93) द्वितीय राजपूत सूचित संदीपसिंग (CGPA-9.89) व तृतीय गिरासे किशोर राजेंद्र (CGPA-9.89) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपले स्थान महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय असे स्थान पटकावले.आणि प्रथम वर्षातील बजाज शलाका राजेश (CGPA-10) बागुल भाविका शरद (CGPA-9.93)मगरे सुशिल शशिकांत (CGPA-9.86) या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यासह आपले स्थान महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत प्रथम, द्वितीय व तृतीय असे स्थान पटकावले.
येथील आर. सी. पटेल वरिष्ठ महाविद्यालयात व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमाचा
इंडक्शन कार्यक्रम दिनांक ०३ ते ०६ ऑगस्ट २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आला
होता. सदर कार्यक्रम नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी प्रामुख्याने घेण्यात येत असतो.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते विद्यार्थ्यांना नवीन वातावरण आणि नवीन परिसंस्थेतील संस्कृतीचे परिचय
होणे व महाविद्यालयातील विविध विभाग त्या अंतर्गत चालणाऱ्या कार्यक्रमाची ओळख व्हावी हे
उद्दिष्ट समोर होते. चार दिवसाच्या या कार्यक्रमात, पहिल्या दिवशी वरिष्ठ आणि कनिष्ठ
विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधला गेला त्यानंतर अँटी-रॅगिंग या विषयावर मार्गदर्शन केले. या
व्यतिरिक्त विविध खेळ विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले होते. दुसऱ्या दिवशी वेशभूषा, कौशल्य,
करिअरची उद्दिष्टे या विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच तिसऱ्या दिवशी संवाद कौशल्य, लाईफ
कौशल्य व प्रेरक व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. दिनांक 6 ऑगस्ट म्हणजे
कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील सर यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, त्यात सरांनी आपले वैयक्तिक अनुभव विद्यार्थ्यान समोर मांडले.
तसेच ग्रंथपाल प्रा.रत्नेश्वर भावसार सर यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथालयाबद्दल माहिती दिली, क्रीडा
विभागाच्या संचालिका प्रा.हर्षदा पाटील मॅडम यांनी क्रीडा विषयी माहिती दिली. विद्यालयात
असलेल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल बद्दल ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सपना येशी यांनी
माहिती दिली.
शिरपूर- येथील आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.एम.एस.(ई-कॉमर्स) विभागातील विद्यार्थ्यांनी क.ब.चौ.उत्तर महाराष्ट्र विद्यापीठस्थरीय परीक्षेत उत्तम यश मिळवीत विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्यासह आपले महाविद्यालयाचे दरवर्षी प्रमाणे या वर्षीही नाव गौरविले आहे. आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील बी.एम.एस.(ई-कॉमर्स) विभागातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्थरीय परीक्षेचा तृतीय वर्षातील निकाल १००% असून हर्शल संतोष भोई ९.७५.CGPA नरेश मनोज अग्रवाल ९.७५ CGPA. प्रवीण दिगंबर शेटेवाणी ९.७१ CGPA. आणि मण्यार आकीफ अस्पाक ९.६८ CGPA या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे विद्यापीठात तृतीय,चतुर्थ अश्या विशेष प्राविण्यासह आपले स्थान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे.तसेच द्वितीय वर्गातील विद्यार्थी अक्षय चव्हाण,देवरे धनंजय व भाग्यश्री सुतार अनुक्रमे प्रथम,द्वितीय व तृतीय असे क्रमांक महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत मिळविले आहे.